पालघर: जुचंद्र, गोरातपाडा, म्हात्रेनगर येथे विकास कामांचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते भूमिपूजन
वसईच्या आमदार स्नेहा दोघे पंडित यांच्या हस्ते जुचंद्र, गोरात पाडा, म्हात्रे नगर, कामण नाका येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. गरीब नवाज हॉटेल ते गोरात पाडा रस्ता डांबरीकरण, कामण नाका ते म्हात्रे नगर रस्ता डांबरीकरण, जूचंद्र येथील नायगाव बापाणे रस्त्यावर पाच ठिकाणी कालवर्ट बांधकामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ज्युनिअर अभियंता, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.