धाराशिव: वाडीबामणीत भांडण सोडवल्याच्या रागातून घरात घुसून हल्ला; बेंबळी पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल
Dharashiv, Dharavshiv | Sep 3, 2025
धाराशिव तालुक्यातील वाडीबामणी येथे समोर आले आहे. मावस भावासोबतचे भांडण सोडवल्याचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यासह दोन भावांवर कोयता आणि काठीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संस्कार विठ्ठल शितोळे (वय १९) यांनी फिर्याद दिली आहे, माहिती बेंबळी पोलिसांच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.