अकोट: रोहन खेड येथील शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
Akot, Akola | Oct 18, 2025 *बिग ब्रेकिंग* रोहनखेड येथील शेतकरी नंदकुमार दाणे यांच्या शेतात फवारणी करीता अवधूत वानखडे गेले असतांना रान डुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहीती प्राप्त झाली आहे. वन विभागाने यांची तातडीने नोंद घेण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. आधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मार बसलेला असताना शेती व पिक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होत असतानाच आता वन्य प्राण्यांचे देखील शेतकऱ्यांना आव्हान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.