दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या पार्वश्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील गर्दीच्या ठिकाणी बसस्थानके तसेच रेल्वे स्थानकाची बॉम्ब शोधक पथकाने आज पाहणी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएसचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांच्या पथकाने ही पाहणी केली. यावेळी अहिल्यानगर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बलचे (आरपीएफ) अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते