कोपरगाव: शहरातील खाटीक गल्लीत बर्फ खरेदी-विक्रीवरुन हाणामारी,तीन जखमी , परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल
आइस फॅक्टरीवाल्याने बर्फ संपल्याचे सांगताच चिडलेल्या ग्राहकाने मारहाण केली. त्यानंतर आइस फॅक्टरीवाल्यांनीही ग्राहकाला हातोडा, कैची व टोच्याने मारहाण केली. या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आज २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा.शहर पोलिसांनी माहिती दिली.