पालघर: श्रमाजीवी संघटनेचा वाडा पोलीस ठाण्यावर धडक मूक मोर्चा
श्रमजीवी संघटनेच्या वतीने वाडा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढ आंदोलन करण्यात आले आहे. वाडा पोलीस ठाण्यात दाखल अल्पवयीन मुलीच्याखरेदी विक्री करून तिचं लग्न लावून छळ केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. वाडा पोलीस ठाण्यात वर मूक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आंदोलनात सहभागी झाले.