वरोरा येथील बस स्थानकावर मोठ्या उत्साहाने भगवान बिरसा मुंडा जयंती आज दि 15 नोव्हेंबर 11 वाजता साजरी करण्यात आली . सदर कार्यक्रम आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला विशेष अतिथी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आ. करण देवतळे यांच्या तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ता बंडू लभाने, प्रबोधनकार सामाजिक कार्यकर्ता गीत घोष, पत्रुजी आत्राम,सामाजिक कार्यकर्ता चिंतामण आत्राम,आदींसह उपस्थित होते .