चिखलदरा: मेळघाट चे मा.आ.भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर यांची विश्राम गृह येथे भेट;पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा
मेळघाट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर यांनी आज दुपारी ४ वाजता अंजनगाव सुर्जी येथील विश्राम गृह येथे धावती भेट देऊन भाजपा पदाधिकारी यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. या चर्चेत माजी आमदार रमेश बुंदीले, माजी नगराध्यक्ष ॲड कमलकांतजी लाडोळे, जिल्हा महामंत्री सुधीर रसे,मेळघाट जिल्ह्याचे संयोजक डॉ विलासराव कविटकर, माजी शहराध्यक्ष उमेश भोंडे, शहराध्यक्ष मनिष मेन यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.