लोखंडी बाकडा हातगाडीच्या बाजुला आणून का ठेवला. याबाबत जाब विचारल्याचे वाटल्याने दिनेश प्रवीण लिहेलकर (वय २२, रा. रामेश्र्वर कॉलनी) या तरुणावर कांदा कापण्याच्या सूरीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गांधी उद्यानाजवळ घडली. याप्रकरणी बुधवारी ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.