नालासोपारा वाकणपाडा येथील सुपर इंडस्ट्रीज परिसरातील एका ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना घडली आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पोर्ट झाला आणि अचानक भीषण आग लागली घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.