साक्री: नंदुरबारमध्ये आदिवासी युवक जय वळवी याच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपळनेर बंद बाबत पोलिसांना निवेदन
Sakri, Dhule | Sep 22, 2025 नंदुरबार शहरात आदिवासी तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.याबाबत सोमवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आदिवासी बांधवांनी पिंपळनेर पोलिसांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी समाजाचा जयेश वळवी (जय बाबा) याची १६ सप्टेंबर रोजी कटकारस्थान रचून पोटात धारदार चाकूने वार करून नंदुरबार येथे भर रस्त्यावर हत्या करण्यात आली.