पारनेर: कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली
कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर सडकून टीका केली आहे. रोहित पवार यांना नेता बनायची घाई झाली असल्याचं म्हंटल आहे. रोहित पवार धुतल्या तांदळासारखे वागत असून त्यांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार आहेत. 2019 ला रोहित पवार घायवळच्या मदतीने आमदार झाले असून त्यावेळेस घायवळ गुंड नव्हता का असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सहा वर्षात काय बदल झाला रोहित पवार यांची भूमिका बदलली. रोहित पवारांना अक्कल कमी असून त्यांना नेता बनायची घाई झाली आहे