धर्माबाद: बाभळी बंधारा येथे धर्माबाद उमरी बिलोली नायगाव येथील शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार - शेतकरी साईनाथ जाधव यांची माहिती
धर्माबाद उमरी नायगाव बिलोली येथील गोदावरी नदीकाठचे शेतकरी हे श्रीराम सागर पोचम पहाड डॅम बाभळी बंधाराच्या बॅक वॉटर चा फटका बसून त्यांची शेती पाण्याखाली गेल्याने ते त्रस्त आहेत, त्या शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा यासाठी उद्या दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी बाभळी बंधारा येथे वरील तालुक्यातील शेतकरी हे जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती आज रोजी दुपारी चारच्या सुमारास रोशनगाव येथील शेतकरी साईनाथ पाटील जाधव यांनी धर्माबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहेत