चोपडा: शेतपुरा भागात पतीच्या प्रियशीच्या घरी आली म्हणून महिलेला पतीसह तिघांची मारहाण, चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 17, 2025 चोपडा शहरात शेतपुरा हा भाग आहे. या भागात मनीषा सचिन पाटील वय २८ विवाहिता त्यांचे पती सचिन पाटील यांची प्रियसी काजल कमलेश पानपाटील यांच्या घरी आली होती. तेव्हा याचा राग येऊन सदर महिलेला तिचे पती सचिन पाटील, काजल कमलेश पानपाटील व शोभाबाई वसंत कासट या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली व चाकूने वार करून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.