अकोला महापालिकेत मतदार स्थलांतर वाद; आमदार पठाण यांचा प्रशासनावर गंभीर आरोप अकोला महानगरपालिकेत प्रभाग रचनेत मोठा फेरबदल करून हजारो मतदारांचे एका वार्डातून दुसऱ्यात स्थलांतर केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 1,2,7,11,16 आणि 18 मधील दोन ते तीन हजारांहून अधिक मतदार चुकीने हलवण्यात आल्याचे ते म्हणाले. पठाण यांच्या मते, १ प्रभागातील ४ हजार मतदार दुसरीकडे टाकणे हा प्रशासनाचा मोठा घोळ असून हा प्रकार खासगी व्यक्तीकडून करवून घेतल्याचा संशय आहे