एमआयडीसी परिसरातील नागापूर येथील मर्चंट बँकेत 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांना एकाने पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना घडली आहे बाळू निवृत्ती वारंगाळे असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे व रंगले यांनी त्यांच्या खात्यातून काढलेल्या 39 हजार रुपयांपैकी 14 हजार रुपये अनोळखी व्यक्तीने हुशारीने काढून घेऊन पोबारा केला