जालना: परतूर तालुक्यातील हताश शेतकर्यांचा आत्महत्या करण्यस मजबूर करु नका अशी विनंती; अधिकार्यांची दिशाभुल होत असल्याचा आरोप
Jalna, Jalna | Jul 6, 2026 परतूर तालुक्यातील सातोना बु्र. येथील हतबल आणि हताश झालेल्या शेतकर्याने आता थेट विनंती करुन आत्महत्येसाठी मजबुर करु नका अशी विनंती केली आहे. सोमवार दि. 6 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधून जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांची दिशाभुल करणार्यांनी शेती हडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगीतले. दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र कमी होत असतांना एका शेतकर्यांच्या शेतातून थेट पांदन रस्ता घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरु आहे.बद्रीनारायण बीडवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली.