नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन १२ वीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी कपिल लोणारे (वय ३०) याने पीडितेचे अश्लील फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले.