जालना: जालना कैकाडी मोहल्ल्यातून 3 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त; एक आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | May 1, 2026 जालना शहरातील कैकाडी मोहल्ला परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 3 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.