मोहोळ: चिंचोली एमआयडीसी येथे ट्रॅक्टर गोडाऊनचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरी
Mohol, Solapur | Sep 15, 2025 मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथे ट्रॅक्टर गोडाऊनचा पत्रा उचकटून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) सकाळी समोर आली. याबाबत काशिनाथ मनोहर घुगरे (वय ५७, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे चिंचोली एमआयडीसी फाटा येथे अपोलो कंपनीचे ट्रॅक्टर स्पेअर पार्टचे गोडाऊन आहे. फिर्यादींचे मॅनेजर यांनी २८ ऑगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे गोडाऊन बंद केले होते.