पारोळा: केटीवेअर बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू
Parola, Jalgaon | Sep 27, 2025 पारोळा-------तालुक्यातील बोरी नदी केटीवेअर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेला पंधरा वर्षीय मुलाचा पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. हिरालाल सुनील पवार रा.टोळी ह.मु. पिंप्री असे मृत मुलाचे नाव आहे. हिरालाल आणि त्याचा भाऊ भोजराज हे दोघं दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावा जवळील बोरी नदी बंधाऱ्यावर आंघोळ करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी हिरालाल याचा पाय घसरल्याने पाण्यात पळून मृत्यू झाला.