भंडारा नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार तथा महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांनी भंडारा येथील ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूम (गोडाऊन) परिसराला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह राहावी या उद्देशाने त्यांनी स्ट्राँग रूमची सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती, प्रवेश व निर्गमन व्यवस्था तसेच सीलिंग प्रक्रियेची सविस्तर माहिती निवडणूक...