वर्धा: कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे पी एम किसान निधीची २१वी किस्त वितरण सोहळा थेट प्रक्षेपण व मार्गदर्शन
Wardha, Wardha | Nov 20, 2025 वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले.कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ जीवन कतोरे यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तांत्रिक सत्रा दरम्यान डॉ रुपेश झाडोदे यांनीचना पीक लागवड व खत व्यवस्थापन विषयी तर डॉ निलेश वझीरे यांनी रबी पिकातील कीड व रोग नियंत्रण या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ही माहिती दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिली आहे.