निफाड: द्राक्षबागेवर कुऱ्हाड! निफाड तालुक्यात कोटमगावच्या शेतकऱ्याचा निर्णय...
Niphad, Nashik | Oct 25, 2025 निफाड तालुक्यातील लासलगावजवळील कोटमगाव येथील एका शेतकऱ्याने तर आपल्या दोन एकर द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालवत ती भुईसपाट करण्याचा निर्णय घेतला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना यंदा फळधारणा झालेली नाही. त्यातच कर्जाचा वाढता डोंगर आणि प्रशासनाकडून पंचनामा न झाल्याने या शेतकऱ्याचा संताप फुटला आहे.