वणी: भालर मार्गावरील जीएस ऑईल कंपनीत आढळला युवकाचा मृतदेह, खुनाचा संशय दोघांना अटक
Wani, Yavatmal | Oct 15, 2025 वणी भालर मार्गावरील खंडार अवस्थेतील जीएस ऑईल कंपनीत शहरालगत असलेल्या वागदरा येथील युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून करून मृतदेह बंद कंपनीच्या पाण्याच्या खोल टाक्यात फेकण्यात आल्याचा पूर्णपणे संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना बुधवार दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 12.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मनोज वानखेडे वय अंदाजे 35 वर्षे रा. वगदरा ता. वणी असे या खून झाल्याचा संशय असलेल्या युवकाचे नाव आहे.