उल्हासनगर: 'मी इथला भाई...'म्हणत हवेत केला गोळीबार, मग उल्हासनगर पोलिसांनी घडवली 'अशी' अद्दल
उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथे गरबा कार्यक्रम सुरू असताना 'मी इथला भाई आहे, गरबा कार्यक्रमासाठी कोणाची परवानगी घेतली आहे असे म्हणत लोकांना दम टाकला आणि आरोपी सोहम पवारने हवेत गोळीबार केला. तसेच शिवसेना शाखाप्रमुख बाळा भंगुरे यांच्यावर थेट बंदूक ताणून दहशत पसरवली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथून आरोपी सोहम पवार यांच्यासह त्याचे वडील अनिल पवार या पिता-पुत्रांना ताब्यात घेतले.