भद्रावती: मांगली शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी.
भद्रावती पोलीसात तक्रार दाखल.
तालुक्यातील मांगली येथील शेतशिवारातून नव शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परीसरातील शेतकऱ्यांमधे चिंतेचे वातावरण पसरले आहे. सदर घटना मांगली शेतशिवारात सकाळी उघडकीस आली असुन याबाबत भद्रावती पोलीसात दिनांक १६ रोज मंगळवारला दुपारी तिन वाजता तक्रार दाखल करण्यात आली आहे. भद्रावती पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन ते घटनेचा पुढील तपास करीत आहे.