भद्रावती शहरातील तमाम जनतेच्या सेवेसाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे आज दि 21 नोव्हेंबर ला 4 वाजता खा. प्रतिभा धानोरकर यांनी लोकार्पण केले. आजपासून हे कार्यालय अखंडपणे जनतेच्या सेवेसाठी समर्पित असणार आहे. भद्रावती शहरातील प्रत्येकाच्या हक्काचे हे कार्यालय स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या विचारांना व माझ्या जनसेवेला नक्कीच बळ देणारे ठरेल हा विश्वास यावेळी खा. धानोरकर यांनी व्यक्त केला.