श्रीवर्धन: श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप युतीच्या संयुक्त प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप युतीच्या संयुक्त प्रचार कार्यालयाचे आज रविवारी दुपारी ४ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. हे कार्यालय युतीच्या भव्य विजयाचे केंद्रस्थान ठरेल हा विश्वास यावेळी मी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र प्रभाकर सातनाक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक, शहराध्यक्ष बबन चाचणे, शहराध्यक्ष रुची बोरकर, सबा फिरफिरे यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार, युतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.