जत: लवंगा ते उमदी या मार्गावर आज भीषण अपघात
Jat, Sangli | Aug 16, 2025 लवंगा ते उमदी या मार्गावर आज भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्याला बाजू पट्टी नसल्याने दोन वाहनांमध्ये झालेल्या या अपघातात वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शुक्रवारी रात्री दहा वाजता पावसाच्या सरी सुरू असताना समोरून दोन मोठी वाहने आली. त्यावेळी एकमेकांना साईड देत असताना रस्त्याच्या कडेला बाजू पट्टी नसल्याने एक वाहन थेट रस्त्याबाहेर पलटी झाले, तर समोरून आलेले दुसरे वाहनदेखील दुसऱ्या बाजूला