राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठी खेप शिंदेसनेच्या लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी काल दि ३ डिसेंम्बर रात्री ८ वाजता वरोरा शहरात पकडली, नगरपरिषदेचे मतदान झाल्यावर तंबाखू माफिया पुन्हा सक्रिय झाला मात्र राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिबंधित तंबाखू वाहतूक एकूण मुद्देमाल १७ लक्ष ४० हजार २६० रुपयांचा पकडत प्रशासनाच्या हवाली केल्याने माफियांचे चांगलेच धाबे दणाणले.याबाबत मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला याबाबत सूचित केले.