जळगाव: शिरसोली गावातील महिलेचा विनयभंग तर तिच्या पतीला जीवेठार मारण्याची धमकी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका भागात राहणारी महिला ह्या कुटुंबासह गच्चीवर झोपलेली असतांना गावात राहणाऱ्या एकाने रविवारी २१ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता अश्लिल वर्तन करत विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला व महिलेला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली. याबाबत सकाळी ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.