जालना: बदनापूरच्या कॅनरा बँकेत 7 कोटी 31 लाखाचा अपहार; दोन आरोपी अटकेत, एक फरार; सीसीटीव्हीही व्हायरल
Jalna, Jalna | Apr 25, 2026 बदनापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून बनावट सोने ठेवत सुमारे 7 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवार दि. 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी.व्ही.यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बँकेचे अधिकारी,शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे.