वर्धा: बाल दिनानिमित्त चाईल्ड हेल्पलाइन से दोस्ती सप्ताहाचा रेल्वे स्टेशन येथे शुभारंभ
Wardha, Wardha | Nov 18, 2025 जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन १०९८ मार्फत रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन येथे बालदिनानिमित्त चाईल्डलाइन से दोस्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरचे मंडल रेल्वे प्रबंधक विनायक गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.