अकोला: "दहा रुपये टाका आणि लाखाचा गंडा! अकोल्यात महिलेची सायबर फसवणूक"
Akola, Akola | Nov 11, 2025 अकोल्यात महापालिका पाणीकराच्या नावाने तब्बल एक लाख सात हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नकला भगत या महिलेच्या मोबाईलवर अकोला महापालिकेचा लोगो असलेला मेसेज आला, ज्यात पाणीकर भरण्याचे सांगून दहा रुपये टाकण्यास सांगितले. महिलेने ऑनलाइन पैसे भरताच तिचं बँक अकाउंट हॅक होऊन संपूर्ण रक्कम गायब झाली. याबाबत तक्रार खदान पोलिस स्टेशन व सायबर क्राईम विभागाकडे करण्यात आली आहे.