हिंगोली: पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना मानवंदना
हिंगोली नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले आणि मानवंदना दिली. शहाजी उमाप यांनी आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी बारा वाजता दरम्यान कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली तसेच पोलीस दलाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती घेतली.