आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चटणी भाकर हे अनोख्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात भाकर आणि चटणी घेऊन एकत्रित भोजन केले आणि शासनाचा निषेध केला. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने मात्र अध्यापित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली.