रेल्वे पोलिसांच्या वतीने पश्चिम रेल्वेच्या पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षेबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी रेल्वे हेल्पलाइन नंबर, रेल्वे विषयक कायदे, रेल्वे रूळ ओलांडण्याचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व विविध विषयांवर मार्गदर्शन करत जनजागृती करण्यात आले. रेल्वे स्थानकातील प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी मार्गदर्शन केले आणि रेल्वे सुरक्षा बाबत जनजागृती केली.