धामणगाव रेल्वे: जुना धामणगाव येथे आमदार प्रताप अडसड यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थी ,विद्यार्थिनींना 112 सायकल वितरण
पी एम के के वाय अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने आमदार प्रताप अडसड यांच्या विशेष प्रयत्नाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील 112 विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वितरण सोहळा संपन्न झाला .जिल्हा परिषद जुना धामणगाव येथे हा कार्यक्रम झाला असून यावेळी आमदार प्रताप अडसूड तहसीलदार अभय घोरपडे, गट विकास अधिकारी योगेश वानखडे, सपनाजी भोगावकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक व अनेक मान्यवर कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित होते.