जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील सभागृहात संपन्न
जळगाव जामोद तालुका शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शहरातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष अमर पाचपोर् यांच्याकडे मावळते शहराध्यक्ष अर्जुन घोलप यांनी सूत्रे दिली. यावेळी काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष एडवोकेट भालेराव, अविनाश उंबरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.