भंडारा: खुटसावरी येथे शिवीगाळ करण्यावरून झालेल्या वादातून तिघांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्याला, कपाळाला गंभीर दुखापत
भंडारा जिल्ह्यातील मौजा खुटसावरी येथे शिवीगाळ करण्याच्या किरकोळ वादातून तीन आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित बित्सोक साखरे (वय ३७, रा. खुटसावरी) हे आपल्या घरातून शिवीगाळ करत बौद्ध विहाराजवळ बसले होते. त्यावेळी पोलिस पाटलांनी त्यांना हटकले असता, आरोपी नंदकिशोर साखरे (वय अंदाजे ५३) तिथे आले आणि त्यांनी 'मी तुझ्या बायकोला फोन करून काही सांगत नाही' असे रणजित यांना बोलल