नांदेड: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार @150 एकता अभियानात सहभागी व्हावे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आव्हान
Nanded, Nanded | Oct 29, 2025 आज दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांचे आव्हान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यात 31 ऑक्टोबर व 7 नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.