अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे काही शाळकरी मुलांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिवरखेड पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली. तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी व्हिडिओची बारकाईने पाहणी केल्यानंतर, मुलं प्रत्यक्षात ‘बहादूरखान जिंदाबाद’ असे म्हणत होते. असा खुलासा पोलिसांनी दिला.