कामठी: कामठी नगर परिषद निवडणूक ; उमेदवारांना चिन्हाचे वाटप
Kamptee, Nagpur | Nov 26, 2025 कामठी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप आज झाले आहे यामुळे आता निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृतपणे वेग येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही चिन्हे वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. ज्या उमेदवारांनी विशिष्ट पक्षाच्या अधिकृत चिन्हावर अर्ज भरला त्यांना संबंधित पक्षाचे चिन्ह देण्यात आले. अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या यादीतून चिन्हे निवडण्याची संधी मिळाली.