तुमसर तिरोडा मार्गावरील बिरसी नाल्याजवळ दुचाकीची ट्रॅक्टरला जबर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 26 डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. यातील दुचाकी चालक हे दुचाकी क्र.MH 36 AP 6454 ने गोंदिया कडे जात असता हा अपघात घडला. यावेळी दोन्ही मृतक हे तुमसर तालुक्यातील तुमसर रोड देव्हाडी येथील असून मृतक युवकांचे नाव यश राजूके आणि भारत बनकर असल्याची माहिती मिळाली आहे . यावेळी घटनेचा अधिक तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.