पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे टोलनाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे टोलनाका येथे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून चिमुकल्याचा झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे मागणी मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आली.