समुद्रपूर: खेक शेत शिवारात गिरड पोलिसांची चुगार अड्ड्यावर मोठी कारवाई: ७ लाख ५६ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
खेक शेत शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गिरड पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळात असलेल्या १४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करीत ७ लाख ५६ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड यांना खेक शेत शिवारात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह धाड टाकून हि कारवाई केली आहे.८ जण ताब्यात घेतले तर ६ जण पोलिसांना पाहुण पसार झाले आहे.