जालना: संतोषी माता मंदिर परिसरातील मनपा घनवनाला पुन्हा आग; उद्यान विभागाच्या दुर्लक्षावर संताप
Jalna, Jalna | May 7, 2026 जालना शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील महानगरपालिकेच्या घनवनाला गेल्या 8 ते 10 दिवसांत दुसर्यांदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार दि. 7 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परिसरात कचरा जाळल्यामुळे ही आग लागल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक सदस्यांकडून माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.