वरोरा: वरोरा येथे माजी नगर उपाध्यक्ष जानवे यांचा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या उपस्थितीत
पक्षप्रवेश
वरोरा येथील नगरपालिकेतील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने (मशाल चिन्ह) येथे सर्व १३ प्रभागांमध्ये उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातील उमेदवारांसाठी एबी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. तथापि, माजी नगर उपाध्यक्ष राहुल जानवे यांच्या आज दि १३ नोव्हेंबर ला १२ वाजता शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशाने निवडणूकीची समीकरणे पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.