आज शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी खारघर प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत सेक्टर ३३ व २७ परिसरातील पेठ गावासमोरील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत होता. खड्ड्यांनी पोखरलेला रस्ता, उडणारी धूळ व असुरक्षित वाहतूक यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.